कोल्हापूर, दि. 15 : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे शुक्रवार, दि. 17 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शासन निधीतून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर शहरातील एसटीच्या नूतन छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह चार बसस्थानकांचे उद्घाटन होणार आहे.
शुक्रवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 10.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.20 वाजता शासकीय विश्रामगृह येथे प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी 11 ते 11.20 वाजता कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे आगमन व बसस्थानकाची पाहणी. सकाळी 11.20 वाजता कोल्हापूर बस स्थानक येथून श्री क्षेत्र अंबाबाई मंदिराकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते 12 वाजता श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर येथे आगमन व दर्शन. दुपारी 12 वाजता वाठार बसस्थानकाकडे प्रयाण. दुपारी 12.20 वाजता वाठार येथे आगमन व बसस्थानक उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता वाठार येथून पेठवडगावकडे प्रयाण. दुपारी 12.40 वाजता पेठवडगाव येथे आगमन व बसस्थानक उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता पेठवडगाव येथून नृसिंहवाडीकडे प्रयाण. दुपारी 1.40 वाजता नृसिंहवाडी येथे आगमन व श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर येथे दर्शन. दुपारी 2 वाजता नृसिंहवाडी येथून जयसिंगपूरकडे प्रयाण. दुपारी 2.20 ते 3 वाजता जयसिंगपूर येथे आगमन व बसस्थानक लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता जयसिंगपूर येथून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 3 ते 3.30 वाजता राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 3.30 वाजता राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानाहून छत्रपती संभाजी महाराज बसस्थानकाकडे प्रयाण. दुपारी 4 ते 4.40 वाजता छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक येथे आगमन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.40 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 5 ते 8 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8.50 वाजता कोल्हापूर विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण.
00000