कोल्हापूर दिनांक 18 – काल सायंकाळी ६. ३०च्या दरम्यान पंचगंगा नदी घाटावर साधारणता ७० वर्षाची सोमवार पेठ येथे राहणारी वृद्ध महिला पाय घसरून पाण्यात पडली यावेळी मासेमारी करणाऱ्यांनी आरडाओरडा केला तेथे उपस्थित असणाऱ्या पंचगंगा आरती मंडळाच्या सदस्यांनी त्वरित धाव घेतली व रमेश गवळी यांनी आहे त्या कापड्यावर पाण्यात उडी मारून वृद्धमहिले ला काठावर आणले १०८ऍम्ब्युलन्स ला फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही यावेळी किशोर घाटगे यांनी ११२नंबरला फोन केला असता अगदी ३ मिनटात पोलीस व ऍम्ब्युलन्स त्वरित येऊन वृद्धेला घेऊन गेले रमेश गवळी यांनी ४८जणांना आतापर्यन्त जीवदान दिले असून पंचगंगा आरती व विहार मंडळाने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
