
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका)* : अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव, माहिती देण्यासाठी अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या अनुषंगाने उद्या गुरुवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी तारबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.