
कोल्हापूर दि. १५ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर आज सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आगमन झाले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी त्यांचे स्वागत केले.
इचलकरंजी येथील कार्यक्रमासाठी विशेष विमानाने ते कोल्हापूर येथे आले होते. त्यांच्यासोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही आगमन झाले.
कोल्हापूर विमानतळावरुन लगेच त्यांनी इचलकरंजीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान केले. इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन ते करणार आहेत. त्यानंतर त्यांचा सांगली दौरा असून सांगली वरुन पुणे येथे विविध कार्यक्रमांसाठी प्रस्थान करणार आहेत.
***