कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेबद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडी भाजपचे उपाध्यक्ष डॉ. विकास बिसुरे यांची प्रांत ग्राहक संरक्षण समिती संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ग्राहक चळवळीमध्ये अग्रेसर राहून सामान्य ग्राहकाला न्याय देण्याचं काम ते या पदावरुन करतील असा विश्वास आहे. महाराष्ट्रात नवीन कार्यकारणी स्थापन करण्याचे सर्वांधिकार त्यांना या निमित्ताने देण्यात आले आहेत. गेली ३० वर्षे महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण भारतभर आपल्या संघटनेचे पदाधिकारी असून ते ग्राहक चळवळीमध्ये काम करीत आहेत, अशी माहिती प्रांत ग्राहक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
गोरगरीबांची सुख-दु:खे आपली समजून त्यांच्यासाठी काम करणारे, हजारो युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन त्यांना सक्षम बनिवण्यामध्ये यशस्वी झालेले सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर माजी जिल्हा उद्योग आघाडी भाजपचे उपाध्यक्ष डॉ. विकास बिसुरे यांची राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेच्या वतीने दखल घेवून त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड केली. या निवडीचे पत्र संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी दिले आहे. महाराष्ट्रात नवीन कार्यकारणी स्थापन करण्याचे सर्वांधिकार डाँ. विकास बिसुरे यांना दिल्याचे राजेश भोसले यांनी सांगितले आहे.
कोल्हापूरातील कसबा बावडा येथे राहणारे डाँ. बिसुरे यांनी आतापर्यंत जिल्हा क्षेत्र अधिकारी. दिव्याग आघाडी व जिल्हा उद्योग आघाडीच्या माध्यमातून व कोरोना काळामध्ये प्लाझ्मा मृत्यू च्या परस्थिती मध्ये असणाऱ्या लोकांना जीवदान दिले. अनेक युवकांना कर्ज प्रकरणे उपलब्ध करुन दिली आहेत. त्यांचेकडे येणारा प्रत्येक युवक रोजगार साठी त्यांनी उपलब्ध करून दिले व घर कर्ज रिकाम्या हाताने परत जात नाही, अनेक तरुण मंडळांना त्यांचा आर्थिक हातभार असतो. त्यांनी अल्प काळात नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कामसुद्धा गौरवास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेने घेतल्याने डॉ. बिसुरे यांचे कौतुक होत आहे.
