कोल्हापूर दिनांक 8 – कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील दत्ताजीराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य शरद काटकर याने त्याच महाविद्यालयातील दीपक गुंडू कांबळे या शिक्षकाची डिग्री बोगस नसल्याबाबत इंदोर येथील विद्यापीठाची खोटी कागदपत्रे सादर करून त्याला वाचवायचा नादात स्वतःच अडकला आहे.त्यामुळे दोघांचेही पगार जिल्हा परिषद प्रशासनाने थांबविले आहेत.तसेच सुमारे एक कोटीच्या वर शासनाचा पगार खाल्लेल्या शिक्षकावर व प्राचार्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार का याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दत्ताजीराव मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक दीपक गुंडू कांबळे या शिक्षकाची एम. ए.आर्ट्स ची डिग्री खोटी असल्याच्या संशयातून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानुसार संबंधित महाविद्यालयाला याबाबत तपासणी करण्याचे कळविण्यात आले होते.त्यानुसार प्राचार्य शरद काटकर याने त्या शिक्षकाला वाचवण्यासाठी “सुपारी” घेतली असल्याचे बोलले जात होते.त्यानुसार त्याने चक्क इंदोर येथील विद्यापीठाची खोटी कागदपत्रे सादर केली त्यात दीपक कांबळे याची डिग्री सत्य असल्याचे नमूद केले होते.परंतु त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांना इंदोर येथे पाठवून रीतसर तपासणी साठी अर्ज केला त्यानुसार काही दिवसात इंदोर येथील विद्यापीठाने सदरची दीपक गुंडू कांबळे याची डिग्री त्यांच्याकडून दिली गेली नसल्याचे कळविले आणि प्राचार्याचे बिंग फुटले.त्यानुसार तो प्राचार्य आता जिल्हा परिषद प्रशासनाला “काय कारवाई करावी याबाबत मार्गदर्शन करावे” असे सांगत असून “चोराच्या उलट्या बोंबा….” असा प्रकार होत असल्याच्या चर्चा तिसंगी व आसपासच्या गावात रंगू लागल्या आहेत.
त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा पगार खाल्लेल्या शिक्षकावर व प्राचार्यावर वसुलीसह फौजदारी गुन्हा दाखल होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा निंदनीय प्रकार समोर आला असून समाजात नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
