कोल्हापूर – गडहिंग्लज पोलिस ठाण्यामध्ये महिला सहायक पोलिस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे रा. के. डी. सी.सी. बँक कॉलनी , गडहिंग्लज यांना रु.40000 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.या महिला पोलिस अधिकारी यांच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध गडहिंग्लज पोलिस ठाणे येथे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहन जप्त करण्यात आले होते.त्याच्या मोबदल्यात तसेच गुन्ह्यातील कलमे कमी करून,गुन्ह्याचे कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात एकूण रु.60000 ची लाच मागणी होत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 05 जुलै 2025 रोजी पंचासमक्ष तडजोडीअंती रु.40000 घेताना रंगेहाथ पकडले.या कारवाईत पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप,पोलिस हवालदार सुधीर पाटील,संदीप काशिद,पोलिस हेड कॉन्स्टेबल संगीता गावडे,पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील,संदीप पोवार यांचे पथक सहभागी होते..
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
