कोल्हापूर दिनांक 24 – करवीर तालुक्यातील कोपार्डे गावातील नगर भूमापन क्रमांक १९२ या जागेवर ग्रामपंचायतीने शासकीय निधीतून बांधकामे करून अतिक्रमण केल्याने समतावादी महासंघाच्या वतीने बुधवार दिनांक 25 रोजी करवीर पंचायत समिती कार्यालसमोर निदर्शने करण्यात आली.
याबाबत समतावादी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले की,सदरची जागा ही लक्ष्मी शंकर बुरुड या मागासवर्गीय गरीब कुटुंबाची मिळकत आहे.त्यांच्या या खाजगी मिळकतीत कोपार्डे ग्रामपंचायत यांनी पूर्वी दांडगाव्याने तीन दुकान गाळे बांधलेले आहेत. व तेव्हापासून ग्रामपंचायत यांनी ती सर्व दुकान गाळे भाडे तत्वावर देऊन त्यांच्याकडून भाडे आकारणी करीत आहेत. सदरच्या जागेचे मालक हे अशिक्षित व गरीब असल्यानेच त्यांच्या असाह्यतेचा फायदा घेत बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने ग्रामपंचायत यांनी खाजगी जागेत अतिक्रमण करून दुकान गाळे बांधलेले आहेत. हे दुकान गाळे बांधण्यासाठी शासकीय कोणत्या फंडातून निधी वापरण्यात आला ? व खाजगी जागेत शासकीय निधी कसा लावण्यात आला ? या बांधलेल्या दुकानगाळ्याबाबत या पूर्वीही आम्ही निवेदन देऊन चौकशी करण्याबाबत विनंती केलेली होती परंतु अद्याप या बाबत कोणत्याही प्रकारची चौकशी पंचायत समिती करवीर कार्यालयाकडून झालेली नाही असे सांगण्यात आले.त्यामुळे त्यांच्या बेजबाबदार कृत्याच्या निषेधार्थ समतावादी महासंघाचे वतीने करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर “निदर्शने करण्यात आली.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
