कोल्हापुर दिनांक 25- जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापुर जिल्हयामध्ये घडणारे गैरकृत्ये, बेकायदेशीर कृत्ये, अवैध व्यवसाय तसेच महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार यांना प्रतिबंध करणेबाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.कोल्हापुर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतुन कोल्हापूर जिल्हयातील नागरीकांना आपले वास्तव्याचे परिसरामध्ये कोणतेही गैरकृत्य आढळुन
आल्यास, बेकायदेशिर व्यवसाय सुरु असल्यास तसेच महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार त्यामध्ये कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण तसेच शाळा,कॉलेज, परिसरामध्ये मुलींची छेडछाड असे प्रकार आढळुन आल्यास त्याची माहिती पोलीसांना देणे नागरीकांना सुलभ व्हावे या करीता नव्याने हेल्पलाईन सुरु केलेली आहे. सदर हेल्पलाईनचा क्रमांक ९८२२७६६१०० असा असुन सदरची हेल्पलाईन ही सर्व नागरीकांसाठी २४ तास सुरु असणार आहे. तरी आपल्या वास्तव्याचे परिसरामध्ये अथवा आजुबाजुचे परिसरामध्ये वरील प्रमाणे कोणतेही गैरकृत्य आढळुन आल्यास त्याची माहिती तात्काळ सदरच्या हेल्पलाईन नंबरवर देणेत यावी. सदर हेल्पलाईनवर माहिती देणा-या इसमाचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे कोल्हापूर पोलीस दला तर्फे नागरीकांना आवाहन करणेत येत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
