कोल्हापूर दिनांक 24 – महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सर्व शाळांना सी सी टी व्ही बसविणे बंधनकारक असताना ज्या शाळांनी अद्याप सीसीटीव्ही बसविले नाहीत त्या सर्व शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली आहे.
राज्यात शाळेतील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.परंतु ज्या खाजगी शाळा आहेत त्या पैकी बहुतांश शाळांनी अद्याप कार्यवाही केली नसल्याचे सांगून अशा शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनच्या शिष्ट मंडळाला दिले.अन्यथा समितीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या टीमला जागेवर पाचारण करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
