कोल्हापूर दिनांक 24- माहिती अधिकार अन्वये प्राप्त माहितीने तक्रारीची भीती दाखवत 15 लाखाच्या खंडणी मागणाऱ्या जयराज कोळी रा.नेहरूनगर व युवराज खराडे रा.उचगांव या खंडणी बहाद्दरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.सदरची कारवाई लक्ष्मी टेकडी परिसरात महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली.
अजिंक्य अनिल पाटील, रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे पत्नीचे
वैद्यकीय शिक्षण पुर्ण झालेनंतर त्या सीपीआर हॉस्पीटल येथे बंधपत्राप्रमाणे एम. डी. डॉक्टर म्हणुन सन 2024 ते मार्च 2025 पर्यत कार्यरत होत्या.अजिंक्य पाटील यांच्या पत्नी सी. पी. आर. हॉस्पीटल,कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांच्या पत्नीस पगारामध्ये काही रक्कम जादा मिळाली होती. त्याबाबत
प्रशासनाचे निदर्शनास येताच त्यांनी पगारातून वाढीव अदा झालेली रक्कम कपात केली होती. परंतू जयराम कोळी या व्यक्तीने सदरची माहिती, माहिती अधिकारान्वये प्राप्त करुन त्याबाबत त्यांचे पत्नीची तक्रार करुन त्यांना नोकरीत अडचणीत आणणार असे म्हणून अजिंक्य पाटील यांचेकडे पैशाची मागणी केली. परंतू त्याचे मागणीप्रमाणे अजिंक्य पाटील यांनी त्यास पैसे देणेस टाळाटाळ करीत असलेने जयराम कोळी याने अजिंक्य पाटील याचे व त्यांचे पत्नीचे विरोधात वेगवेगळया कारणानी तक्रारी अर्ज देवून त्यांना त्रास देणे चालू केले. तसेच सदरचा त्रास नको असेल तर 20 लाख रुपये द्यावे लागतील असे जयराम कोळी याचा मित्र युवराज खराडे यांचेकरवी निरोप पाठविला. जयराम कोळी याचे मागणीप्रमाणे पैसे दिले नाही तर अजिंक्य पाटील व त्यांचे पत्नीस वेगवेगळ्या प्रकारे त्रास देवून जीवन जगणे मुश्कील करणार अशी धमकी देवू लागला. त्यामुळे त्यांचेत चर्चा होवून 15,00,000/- रु देण्याचे नाईलाजाने तक्रारदार यांनी ठरविले.
जयराम कोळी व युवराज खराडे हे तक्रारदार यांना विनाकारण त्रास देवून 15,00,000/- रुपये खंडणी मागत असलेने व ती त्यांना देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी सदरबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना समक्ष भेटून सदरची माहिती दिली. सदरचा
प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सदरबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना पुढील योग्य ती कारवाई करणेबाबत आदेश
दिले.पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व इतर पोलीस अमंलदार यांची दोन
पथके तयार करुन तक्रारदार अजिंक्य पाटील यांचेशी चर्चा करुन खंडणी मागणारे इसमांना रंगेहाथ पकडणेकरीता नियोजन केले. दि. 23.06.2025 रोजी खंडणी मागणारे इसमांचे मागणीप्रमाणे पैसे देणेकरीता 500/- रु दराच्या नोटांचे कोरे कागदाचे बंडल तयार करुन त्या बंडलाचे खाली व वरील बाजूस 500/- रु दराच्या नोटा लावून एकूण 15,00,000/- रु देत असलेबाबत नियोजन केले. अजिक्य पाटील यांनी खंडणी मागणारे इसमांना फोन केला असता त्यांनी प्रथम कागल याठिकाणी बोलावले.त्यानंतर कागल येथे जावून त्यांना फोन केलेनंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून शेवटी
लक्ष्मीटेकडी ते पंचतारांकीत एम. आय. डी. सी. रोडकडे जाणारे महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ बोलावून घेतले.खंडणी मागणारे इसमांचे मागणीप्रमाणे महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ जयराम कोळी व युवराज
खराडे हे अजिंक्य पाटील यांचेकडून खंडणी म्हणून 15,00,000/- रु रोख रक्कम स्विकारत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
