कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी/विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम 1 ते 3 किंवा ५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिनांक 20 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडाळाचे (मर्या) जिल्हा व्यवस्थापक प्रशांत तेलंग यांनी केले आहे.
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी हस्तलिखित अर्ज, सन २०२४-२5 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड, व आधारकार्ड इ. कागदपत्रे सादर करावीत. दिलेल्या मुदतीनतंर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
इच्छुक मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी दि. 20 जुलै २०२5 पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, डॉ. बाबर हॉस्पिटलच्या मागे, सदर बाजार ताराराणी पुतळा जवळ, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावेत.
