कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 22 मार्च 2025 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता एचपीव्ही लसीकरण संदर्भांत आढावा बैठक. (स्थळ : छत्रपती शाहू सभागृह, गडहिंग्लज) दुपारी 12 वाजता वडरगे, ता. गडहिंग्लज येथे यात्रेनिमित्त सदिच्छा भेट. (स्थळ : वडरगे, ता. गडहिंग्लज) दुपारी 2 ते सायं. 6 वाजता राखीव. सायं. 6 वाजता सुळकूड ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा. (स्थळ : सुळकूड, ता. कागल) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम. (स्थळ : बहुउद्देशीय हॉल, कागल) सोयीनुसार कागल येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000