कोल्हापूर दिनांक 21 – डॉ हितेश गांधी यांचे आझाद गल्ली गुजरी येथे अरिहंत हॉस्पिटल आहे.काल एका रुग्णाकडे आधीची उधारी मागितली म्हणून काहींनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टर गांधी यांना जबर मारहाण केली.त्यामुळे संशयित गणेश काकडे याच्यासह 8 जणांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर संघटना निमा यांच्यावतीने अशा प्रवृत्तीमुळे डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देणे कठीण बनले असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे सदर आरोपींवर कडक कारवाई करून समाजात भयमुक्त वातावरणात वैद्यकीय सेवा देणेकामी कार्यवाही व्हावी.तसेच गुंडांकडून हॉस्पिटल तोडफोडीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.यावेळी निमा प्रेसिडेंट मुकुंद मोकाशी, के एम ए प्रेसिडेंट डॉ अमोल कोडोलीकर, जी पी ए प्रेसिडेंट डॉ अरुण धुमाळे व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.