Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या निर्देशानुसार रविवारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, करवीर पोलीस ठाण्याचे अंमलदार ,अन्न औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत पिरवाडी येथे हातभट्टी दारू विक्री करणारी बेबी रवी मछले ही संशयित महिला विनापरवाना अवैधपणे देशी व विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याने या महिलेविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला. पिरवाडी गावातील बेबी रवी मछले या महिलेवर सन 2025 पासून ते आज अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 11 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गावठी हातभट्टी…
कोल्हापूर, दि.20 (जिमाका) : संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी शक्तीपीठाला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थिती लावली. मंदिराच्या कामाच्या शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करण्यापूर्वी त्यांनी पत्नी सोनल शहा यांच्यासोबत दर्शन घेतले. दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण देवस्थान असणाऱ्या व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणून श्रध्देय असणाऱ्या या मंदिराप्रति केंद्रीय मंत्री अमित शहा यांची श्रद्धा सर्वश्रुत आहे. आज मंदिरात आगमन झाल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या विकास कामांकडे लक्ष देत नव्याने बसवण्यात आलेल्या सुवर्णकलशाकडे देखील लक्ष वेधले. मंदिराच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाची माहिती त्यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री…
कोल्हापूर दि : 20 (जिमाका) दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर शासनाच्या तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री…
मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ कोल्हापूर, दि. २० (जि.मा.का.)* : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग…
कोल्हापूर, दि.19(जिमाका) : पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवार, २० जून रोजी सकाळी होणार आहे. हा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व करवीर निवासिनी श्री अंबाबाई विकास आराखडा अंतर्गत हा विकास प्रकल्प राबवला जात आहे. नवीन प्रदक्षिणा मार्गामुळे भाविकांना मंदिर प्रदक्षिणा करताना अधिक सुविधा, सुसज्जता आणि सुरक्षितता उपलब्ध होणार आहे. तसेच परिवार देवता मंदिरांचे संवर्धन व सुशोभीकरण…
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवार, 23 जून रोजी कोल्हापुरात क्रीडा ज्योत रॅली आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 250 ते 300 खेळाडू या रॅलीत सहभागी होणार असून सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले. ऑलिम्पिक चळवळीचे जनक पियरे डी कौबर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी ग्रीस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. त्या स्मरणार्थ दरवर्षी 23 जून हा दिवस जगभरात ‘जागतिक ऑलिम्पिक डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतात भारतीय ऑलिम्पिक संघ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने 1952 पासून ऑलिम्पिक डे आणि ऑलिम्पिक…
कोल्हापूर, दि. 19 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर आणि आजरा महाविद्यालय, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जून रोजी सकाळी 10 ते दु. 2 या वेळेत आजरा महाविद्यालय येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 7 खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून 129 रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा, बी.टेक तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला…
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी 26 रोजी ‘राजर्षी शाहू जयंती’ साजरी केली जाते. त्यानुसार 21 ते 25 जूनपर्यत राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जून रोजी सायं. 6 वाजता सन 2026 चा जेष्ठ इतिहास संशोधक स्व.डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोत्तर) ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यतेखाली प्रदान करण्यात येणार आहे. सर्व करवीरवासियांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी केले . 0000
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शनिवार, 20 जून रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता श्री महालक्ष्मी मंदिराकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता श्री महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व श्री महालक्ष्मी मंदिराच्या जतन व संवर्धन कामाच्या शुभारंभाच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता विमानाने…
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार, दुपारी 12.30 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्क मैदान, इचलकरंजी येथे आगमन व सभेच्या ठिकाणाची पाहणी. सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आगमन व सभेच्या ठिकाणाची पाहणी. सायं. 5 वाजता महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व पाहणी. सायं. 6 वाजता संभाजीनगर निवासस्थान येथे आगनम व राखीव. रात्री 8 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे आगमन प्रित्यर्थ स्वागतास उपस्थित.…