Author: admin

भारत निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी स्वतःची जबाबदारी कशी पार पाडावी आणि नेमके काय करावे, याबाबतची माहिती आपण पाहू. सध्या महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत असून, या काळात बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) प्रत्येक घराला भेट देत आहेत. या प्रक्रियेचा उद्देश प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार यादीतील नोंद अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह राहावी हा आहे. ही केवळ नोंद नव्हे, आपल्या घटनात्मक अधिकाराचा आधारच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बीएलओ घरभेटीला येण्यापूर्वी नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय पोर्टल किंवा मोबाईल ॲप किंवा आयोगाच्या…

Read More

कोल्हापूर, दि. 09 (जिमाका): वैद्यकीय (MBBS, BAMS आदी) व अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या बीए, बीएससी, बीकॉम, डिप्लोमा किंवा इतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपचा अर्ज भरताना दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी NEET, CET व CAP प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळेपर्यंत काही विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात आणि त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज भरतात. मात्र, नंतर त्याच शैक्षणिक वर्षात किंवा पुढील वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यास, पूर्वीच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यामुळे नव्या व्यावसायिक…

Read More

कोल्हापूर, दि. 08 (जिमाका): पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र युवकांना ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप देण्यात येणार असून, दरमहा ९,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावेत. सध्या उपलब्ध असलेल्या संधींमध्ये एचडीएफसी बँक लिमिटेड येथे विक्री व विपणन (Sales & Marketing) क्षेत्रात पदवीधरांसाठी १८ जागा असून अर्जाची अंतिम मुदत ३० जुलै आहे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड येथे बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी…

Read More

ल्हापूर, दि. ०८ (जिमाका): राज्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व नियमबद्ध आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या कायदेशीर व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे कोल्हापूर मंडळही कार्यरत असून, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे. कोल्हापूर मंडळात बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत एकूण १ हजार ३६० खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर – ६७०, सांगली – ४५८, रत्नागिरी – १४६ आणि…

Read More

कोल्हापूर, दि. 08 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4.60 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे, तुळशी नदीवरील- कसबा बीड, आरे व बाचणी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, सांगरुळ, धामणी नदीवरील- सुळे, वारणा नदीवरील- कोडोली, मांगलेसावर्डे, खोची, शिगाव, चावरे व दानोळी, कडवी नदीवरील-कोपार्डे, सवतेसावर्डे, सरुडपाटणे व शिरगाव, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, शाळी नदवरील- येळाणे, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण,…

Read More

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेल्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यावश्यक आहे. मात्र, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारभावातील चढ-उतार, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणा यांसारख्या संकटांमुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देतानाच त्यांना पुन्हा आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा आर्थिक आत्मविश्वास पुनर्स्थापित करून त्यांना नव्याने कर्जपात्र बनविण्याचा दूरदृष्टीचा प्रयत्न आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या कर्जमुक्ती उपक्रमांपैकी एक असलेल्या या योजनेद्वारे सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेची…

Read More

अघोरी विचारातून रस्त्यावर लिंबू-मिरची टाकल्याने, करणीमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अघोरी विधी केल्याने शत्रूचा नायनाट होतो किंवा चमत्काराने आजार बरा होतो, अशा समजुती जेव्हा माणसाच्या विवेकावर मात करतात, तेव्हा अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक श्रद्धेची बाब राहत नाही; ती गुन्हेगारीला खतपाणी घालणारी सामाजिक समस्या बनते. भीती, असहायता आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेत विकृत भोंदू बाबा, मांत्रिक आणि फसवे लोक आर्थिक लूट, शारीरिक छळ, लैंगिक अत्याचार आणि अमानुष कृत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना खतपाणी घालतात. त्यामुळे अंधश्रद्धेकडे केवळ चुकीची समजूत म्हणून नव्हे, तर समाजाच्या सुरक्षिततेसमोरील एक गंभीर आव्हान म्हणून पाहण्याची गरज आहे. स्मशानभूमीच्या परिसरात अघोरी पूजा, नदी घाटावर जादूटोण्याचे विधी, करणी काढण्याच्या नावाखाली उपचार,…

Read More

मतदानाचा दिवस उजाडतो. उत्साहाने एक नागरिक मतदान केंद्रावर पोहोचतो. रांगेत उभा राहतो. त्याची वेळ येते. मात्र मतदार यादी तपासल्यानंतर त्याला सांगितले जाते आपले नाव यादीत नाही. काही क्षणांसाठी तो स्तब्ध होतो. मतदानाचा अधिकार असतानाही तो त्या दिवशी तो वापरू शकत नाही. त्या क्षणी त्याला जाणवते की लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार केवळ मतदानाच्या दिवशी मिळत नाही; तो त्याही आधी मतदार यादीत आपल्या नावाच्या अचूक नोंदीपासून सुरू होतो. ही जाणीव प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी, यासाठी भारत निवडणूक आयोग वेळोवेळी मतदार यादी अद्ययावत ठेवण्याचे काम करतो. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर). ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय उपक्रम नाही; ती…

Read More

मुंबई, दि 7 जुलै: जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग. 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.…

Read More

कोल्हापूर, दि. 06 (जिमाका): हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र (संमिश्र कार्यशाळा) येथे अस्थीव्यंग, मुखबधीर, अंध आणि मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर, मोबाईल रिपेअरिंग, हस्तकला, टायपिंग, बागकाम, फॅशन डिझाईन असे विविध कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्टायफंडचीही सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व भोजनाची मोफत सोय असून प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुक दिव्यांगांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी यशोधा विश्वास कॉलनी, आण्णासो शिंदे शाळेजवळ, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर मोबाईल 8793747455 व 9107059797 या क्रमांकांवर इच्छुकांनी संपर्क साधावा. 0000

Read More