Author: admin

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत दि. १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत समता पंधरवडा निमित्ताने जात पडताळणी पंधरवड्याचे तसेच सामाजिक न्याय पर्व दिनांक ११ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत जात पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले  यांनी दिली आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित होते व पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेंतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…

Read More

वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर यांच्या संयुक्तविद्यमाने मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन कोल्हापूर, दि.०५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्या मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबीरातून गरीब गरजू रूग्णांना मोफत उपचार मिळतील तसेच या ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉक्टरांना अनुभव, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या पुढाकारातून छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात प्रसिद्ध लॅप्रोस्कॉपी तज्ज्ञ डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्या सहाय्याने दोन दिवशीय मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, पित्ताशय तसेच गर्भाशय पिशवी काढणे, हार्निया…

Read More

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो. अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र…

Read More

कोल्हापूर दिनांक – 31 कोल्हापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ए.एस.ट्रेडर्स शेअर मार्केट गुंतवणूक दार फसवणूक प्रकरणातील अटकेत असणाऱ्या अमित शिंदे याची आलिशान मर्सिडीज बेंझ पुण्यातून ताब्यात घेण्यात आली आहे.कोल्हापूर पोलिसांनी सदरची कारवाई केली. कंपनीच्या संचालक यांनी गुंतवणूकदार यांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याने याबाबत बऱ्याच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये यापूर्वीच अटकेत असणारा अमित शिंदे याची पत्नी सौ आर्या यांच्या नावावर असणारी आलिशान मर्सिडीज बेंझ ही कार कोथरूड पुणे येथे ऑटोमेशन शोरुम ला आली असल्याची गोपनीय माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी त्या शोरुम मधून सदरच्या गुन्ह्यात ब्लॅकलिस्ट कार जप्त करून ताब्यात घेतली आहे. सदर कारवाईत पोलिस अंमलदार…

Read More

कोल्हापूर दि.29(जिमाका): जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात असून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवेळी प्लास्टीक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जोतिबा डोंगरावरील एमटीडीसी सभागृहात आयोजित श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथील श्री जोर्तिंलिंग देव यात्रेच्या पूर्व तयारी नियोजन बैठकीत ते बोलत होते. जोतिबा चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधा व सुरक्षेसाठी पश्चिम देवस्थान समिती, जिल्हा परिषद, पोलीस व वाहतुक प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन विभाग, अन्न व औषध विभाग, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक,…

Read More

कोल्हापूर दिनांक 28 – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या प्रोटोकॉल नुसार वापरात येणारी सुमार दर्जाची गाडी पाहून रोखठोक स्वभावाचे दादांनी प्रशासनाला चांगलं सुनावत व पाच नवीन गाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याविषयी जिल्हा प्रशासनाला सुचित केले…स्वतःच्या व्यक्तिगत कामकाजा बरोबर सामाजिक कामाविषयी पण नेहमीच सतर्क असणाऱ्या दादांना स्वतःच्या गाडीच्या सुविधांच्याबद्दल सावधगिरी बाळगत असताना आज हीच कोल्हापूरची जनता कुठल्या त्रासात व कुठल्या प्रश्नात अडकलेली आहे याचा शोध आणि बोध घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली नाही काय ? असा सवाल शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे…

Read More

पुरुष गटात कोल्हापूरचा संघ प्रथम, महिला गटात धाराशिव संघ प्रथम विजेता किशोर गटात कोल्हापूर संघ प्रथम, किशोरी गटात सांगलीचा संघ प्रथम विजेता कोल्हापूर, दि.27 (जिमाका): इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी इचलकरंजीला क्रीडासंकुल निश्चितपणे मंजूर करुन देईन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजी वासियांना दिला. इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला येथे कल्लाप्पा आवाडे क्रीडानगरीत आयोजित केलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2024-25 बक्षीस वितरण व निरोप सभारंप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राहूल आवाडे, आमदार…

Read More

 कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : चैत्रशुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा. या उद्देशाने ‘गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा’ हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो. या अनुषंगाने गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (6 वर्षे पूर्ण असणाऱ्या) बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.            …

Read More