Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रम व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वृध्दाश्रम, मतिमंद मुलांची शाळा, मूकबधीर मुलांची शाळा, दिव्यांग मुलांची शाळा अशा १६ ठिकाणी धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी हा आरोग्य शिबीराचा नाविण्यपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास धर्मादाय सह आयुक्त श्रीमती निवेदिता पवार, धर्मादाय उप आयुक्त शरद वाळके, सहायक धर्मादाय आयुक्त-१ आयुर्वेदाचार्य चंद्रमुखी गरड, प्रमुख उपस्थिती कांचनगंगा सुपाते- जाधव, डॉ. रामेश्वरी, न्यासाचे पदाधिकारी तसेच वृध्दाश्रमातील सर्व लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, प्रमुख उपस्थिती कांचनगंगा सुपाते- मातोश्री वृध्दाश्रम…
कोल्हापूर दिनांक 6 – (शाहुवाडी) – ही मैफिल आहे तलवारी आणि पोलादी मनगटांची… ही मैफिल आहे वादळ आणि दिव्यांची भीती नसते कधीही कर्तुत्ववानांना काळाची …कारण ही जात आहे सह्याद्रीच्या वाघांची… या सह्याद्रीच्या रांगेतील कर्तुत्ववान नेतृत्व म्हणजे स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड (दादा) होय. संजयसिंह गायकवाड (दादा) म्हणजे शाहुवाडी तालुक्याच्या हरितक्रांतीचे जनक आज त्यांचा 25वा स्मृतिदिन…. साधी आणि सरळ राहणी असणाऱ्या या सरकार घराण्यातील शाहुवाडी तालुक्यातील सुपात्रे गावच्या या सुपुत्राने शाहुवाडी तालुक्यात हरित क्रांती घडवून आणली. शाहुवाडी मतदार संघातील तालुक्यातील जो आज विकास पाहायला मिळतो आहे त्यात सर्वात मोठे योगदान स्वर्गीय आमदार संजयसिंह (दादा) गायकवाड यांचे आहे. 1985 ला प्रथम ते…
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत दि. १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत समता पंधरवडा निमित्ताने जात पडताळणी पंधरवड्याचे तसेच सामाजिक न्याय पर्व दिनांक ११ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत जात पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी दिली आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित होते व पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेंतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…
वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर यांच्या संयुक्तविद्यमाने मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन कोल्हापूर, दि.०५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्या मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबीरातून गरीब गरजू रूग्णांना मोफत उपचार मिळतील तसेच या ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉक्टरांना अनुभव, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या पुढाकारातून छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात प्रसिद्ध लॅप्रोस्कॉपी तज्ज्ञ डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्या सहाय्याने दोन दिवशीय मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, पित्ताशय तसेच गर्भाशय पिशवी काढणे, हार्निया…
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो. अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र…
कोल्हापूर दिनांक – 31 कोल्हापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ए.एस.ट्रेडर्स शेअर मार्केट गुंतवणूक दार फसवणूक प्रकरणातील अटकेत असणाऱ्या अमित शिंदे याची आलिशान मर्सिडीज बेंझ पुण्यातून ताब्यात घेण्यात आली आहे.कोल्हापूर पोलिसांनी सदरची कारवाई केली. कंपनीच्या संचालक यांनी गुंतवणूकदार यांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याने याबाबत बऱ्याच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये यापूर्वीच अटकेत असणारा अमित शिंदे याची पत्नी सौ आर्या यांच्या नावावर असणारी आलिशान मर्सिडीज बेंझ ही कार कोथरूड पुणे येथे ऑटोमेशन शोरुम ला आली असल्याची गोपनीय माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी त्या शोरुम मधून सदरच्या गुन्ह्यात ब्लॅकलिस्ट कार जप्त करून ताब्यात घेतली आहे. सदर कारवाईत पोलिस अंमलदार…
कोल्हापूर दि.29(जिमाका): जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात असून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवेळी प्लास्टीक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जोतिबा डोंगरावरील एमटीडीसी सभागृहात आयोजित श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथील श्री जोर्तिंलिंग देव यात्रेच्या पूर्व तयारी नियोजन बैठकीत ते बोलत होते. जोतिबा चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधा व सुरक्षेसाठी पश्चिम देवस्थान समिती, जिल्हा परिषद, पोलीस व वाहतुक प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन विभाग, अन्न व औषध विभाग, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक,…
कोल्हापूर दिनांक 28 – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या प्रोटोकॉल नुसार वापरात येणारी सुमार दर्जाची गाडी पाहून रोखठोक स्वभावाचे दादांनी प्रशासनाला चांगलं सुनावत व पाच नवीन गाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याविषयी जिल्हा प्रशासनाला सुचित केले…स्वतःच्या व्यक्तिगत कामकाजा बरोबर सामाजिक कामाविषयी पण नेहमीच सतर्क असणाऱ्या दादांना स्वतःच्या गाडीच्या सुविधांच्याबद्दल सावधगिरी बाळगत असताना आज हीच कोल्हापूरची जनता कुठल्या त्रासात व कुठल्या प्रश्नात अडकलेली आहे याचा शोध आणि बोध घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली नाही काय ? असा सवाल शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे…