Author: admin

कोल्हापूर दिनांक 24- माहिती अधिकार अन्वये प्राप्त माहितीने तक्रारीची भीती दाखवत 15 लाखाच्या खंडणी मागणाऱ्या जयराज कोळी रा.नेहरूनगर व युवराज खराडे रा.उचगांव या खंडणी बहाद्दरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.सदरची कारवाई लक्ष्मी टेकडी परिसरात महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. अजिंक्य अनिल पाटील, रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे पत्नीचे वैद्यकीय शिक्षण पुर्ण झालेनंतर त्या सीपीआर हॉस्पीटल येथे बंधपत्राप्रमाणे एम. डी. डॉक्टर म्हणुन सन 2024 ते मार्च 2025 पर्यत कार्यरत होत्या.अजिंक्य पाटील यांच्या पत्नी सी. पी. आर. हॉस्पीटल,कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांच्या पत्नीस पगारामध्ये काही रक्कम जादा मिळाली होती. त्याबाबत प्रशासनाचे निदर्शनास येताच त्यांनी पगारातून वाढीव अदा झालेली…

Read More

कोल्हापूर दिनांक 24- माहिती अधिकार अन्वये प्राप्त माहितीने तक्रारीची भीती दाखवत 15 लाखाच्या खंडणी मागणाऱ्या जयराज कोळी रा.नेहरूनगर व युवराज खराडे रा.उचगांव या खंडणी बहाद्दरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.सदरची कारवाई लक्ष्मी टेकडी परिसरात महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. अजिंक्य अनिल पाटील, रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे पत्नीचे वैद्यकीय शिक्षण पुर्ण झालेनंतर त्या सीपीआर हॉस्पीटल येथे बंधपत्राप्रमाणे एम. डी. डॉक्टर म्हणुन सन 2024 ते मार्च 2025 पर्यत कार्यरत होत्या.अजिंक्य पाटील यांच्या पत्नी सी. पी. आर. हॉस्पीटल,कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांच्या पत्नीस पगारामध्ये काही रक्कम जादा मिळाली होती. त्याबाबत प्रशासनाचे निदर्शनास येताच त्यांनी पगारातून वाढीव अदा झालेली…

Read More

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): जिल्ह्यातील व शहरातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खासगी अनुदानित, विना अनुदानित इंग्रजी माध्यमांसह सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 8 ते 8.25 या एकाच वेळेत एकूण 3 हजार 639 शाळांमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये 6 लाख 2 हजार 138 विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी योग दिनात सहभाग नोंदविला होता.* जागतिक योग दिन प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनामार्फत 45 मिनिटांचा प्रात्यक्षिक व्हिडिओ करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून योग दिन हा योगयुक्त शनिवार म्हणून शाळा मध्ये शॉर्ट फिल्म व्याख्यान व शाळा परिसरात प्रचार व प्रसार फेरी आयोजित करण्यात आली होती.…

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी/विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम 1 ते 3 किंवा ५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिनांक 20 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…

Read More

लिंगनूर कापशी, दि.१५: लिंगनूर कापशी ता. कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले. कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी येथील ग्रामस्थांची दिंडीप्रमुख कै. रामचंद्र ढेंगे दिंडी पंढरपूरला पायी वारी निघाली. यावेळी श्री.विठ्ठल पंथी दिंडी व श्री. दत्त पंथी भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन मंत्री श्री. मुश्रीफही सहभागी झाले. टाळ मृदंगाच्या निनादात “विठोबा रखुमाई” च्या गजराने सारा गाव दुमदुमला. दिंडीत सहभागी वारकऱ्यांना मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने रेनकोटांचे वाटपही केले. यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी…

Read More

कोल्हापूर, दि. १३ जून* : रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’ अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर’ हा विशेष उपक्रम सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देणारा हा उपक्रम पर्यटकांना त्यांच्या जीवनाशी निगडित किल्ले आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास देणार आहेत. या योजनेअंतर्गत पहिली ट्रेन ९ जून २०२५ (शिवराज्याभिषेक दिन) रोजी मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटली. आज पहाटे ४:०० वाजता ही ट्रेन कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी जिल्हा प्रशासनाने पर्यटकांचे पुष्प देऊन स्वागत केले. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी यासाठी आयआरसीटीसीने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने ही विशेष सहल आयोजित केली…

Read More

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलच्या परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2025 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीरांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ले. कर्नल. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे. प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 किंवा व्हाट्स अँप क्र. 9172035612 वर संपर्क साधावा.

Read More

पन्हाळा ता. ३० सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम चालू असल्याने पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी होत आहे.आज शुक्रवार असला तरीही पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी होती यातील एका महिला पर्यटकाची पर्स येथील निसार नगारजी या गाईड युवकाला सापडली होती ती त्याने त्यातील सुमारे आडीच लाखाचा ऐवजासह पोलिसांचे समोर परत करत प्रामाणिकपणा दाखवला. पन्हाळगड नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनलेला आहे. त्यामुळे येथे तिन्हीही ऋतुत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. त्यातच मे महिना म्हणजे उन्हाळी सुट्टीचा जणू हंगामच. मग केवळ शनिवारी रविवारच्या सुट्टीचीच वाट कोण बघणार.त्यामुळे शुक्रवार असूनही पन्हाळगड पर्यटकांनी गजबला होता.यात युवकांच्या बरोबरच मोठ्या संख्येने काटुंबासमवेत येणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षानीय होती. अश्याच एक कुटूंब तबक उद्यान परिसरात फिरत…

Read More

कोल्हापूर दिनांक 30 – कोल्हापूरच्या नवीन सुधारित विकास आराखडा नुसार तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजीपूल या रस्त्यावर उड्डाण पूल व अंतर्गत फ्लाय ओव्हर करण्यात येणार आहेत, तथापि तावडे हॉटेल ते सी पी आर चौक येथून खानविलकर पेट्रोल पंप 100 फुटी रोड,स्मशान भूमी ते छत्रपती शिवाजीपूल या मार्गे उड्डाण पूल फ्लायओव्हर करून जुना बुधवार पेठेला पर्यायी रस्ता करून जुना बुधवार पेठेत होणारी वाहतूक कोंडी,रहदारी,नागरिकांना रस्ता ओलडताना होणार त्रास ग्रामीण भागातून कामाला जाणाऱ्या येणाऱ्या गाडया वाहतूक,पर्यटक या सर्वातून मोकळा श्वास घेता यावा यासाठी लवकर पर्यायी रस्ता व्हावा या मागणीचे निवेदनमहानगरपालिका उपायुक्त पंडित पाटिल याना देण्यात आले या वेळी सुशिल भांदिगरे,अनिल पाटील,गणेश जाधव,रणजित…

Read More