Author: admin

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह’ निमित्त 24 सप्टेंबर रोजी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कोल्हापूर येथे विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात यांनी नवजात बालकांमधील श्रवणदोषाची कारणे, श्रवणदोषाचे लवकर निदान व त्याचे महत्त्व तसेच सांकेतिक भाषेचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास आवश्यक उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांचे भवितव्य अधिक सक्षम करता येते, याबाबत त्यांनी माहिती दिली. सांकेतिक भाषेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात व सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत…

Read More

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : ‘सेवा परमो धर्म:’ या भावनेतून सेवा संकल्प अभियानाचा मुलींचे शासकीय वसतिगृह, हातकणंगले येथे आज उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. वसतिगृहातील मुलींनी प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी साकारून परिसराची सजावट केली. मुलींमध्ये सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील जीवनमूल्ये व सेवाभावावर आधारित ‘चलो जीते हैं’ हा प्रेरणादायी लघुपट दाखविण्यात आला. अभियानांतर्गत वसतिगृह व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुली व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसराची स्वच्छता केली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वसतिगृह परिसरात…

Read More

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा व चंदगड या तालुक्यांचा समावेश झाल्याने या सहा तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) लागू करण्यात आली आहे. ‘Trigger-1’ लागू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी…

Read More

कोल्हापूर दि. २६ (जिमाका): पंचायत समिती भुदरगड अंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर रोजी ‘सेवा संकल्प अभियान’ मोठ्या उत्साहात पार पडले. “सेवा माझे योगदान” या मुख्य संकल्पनेखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, महिला-बालविकास आणि पशुसंवर्धन या क्षेत्रांत विविध गतिमान उपक्रम राबवून तालुक्यातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली. सेवा माझे योगदान अंतर्गत ८५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार ७५८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये आभा कार्ड – ५१०, गोल्डन कार्ड- ३४२, रक्त तपासणी- ३७३, नेत्र तपासणी- ४३१, अवयवदान – १२६,…

Read More

कोल्हापूर, दि.26 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. 25 सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे शिकाऊ अनुज्ञप्ती संदर्भातील नियमित शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना शिकाऊ अनुज्ञप्ती मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित नियम व तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींबाबत उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या शिबिराचा एकूण 103 नागरिकांनी लाभ घेतला असून त्यांना शिकाऊ अनुज्ञप्तीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. **

Read More

कोल्हापूर, दि.२६ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय आयुष अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, आयुष, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध आयुर्वेदिक आरोग्य शिबिरे, योग, ध्यान व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. ११ वा आयुर्वेद दिवस २३ सप्टेंबर आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन १ ऑक्टोबरच्या अनुषंगाने ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी सन्मती हायस्कूल, तारदाळ येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत २५० शालेय मुलांसाठी योग व ध्यान शिबिर घेण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या आयुष विभागामार्फत सुदर्शन…

Read More

कोल्हापूर, दि.२६ (जिमाका) : कृषी विभागाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’नव्या स्वरूपात लागू केली असून, योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता वहितीधारक शेतकऱ्यांसह भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. १० सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सुधारित योजना एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. पूर्वीच्या योजनेत प्रामुख्याने खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश होता. सुधारित योजनेत भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी तसेच पात्र कुटुंबातील सदस्यांचा समावेश करून योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. वहितीधारक खातेदार शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील…

Read More

कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर २०२६ : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील ज्ञान, भक्ती आणि लोकसंस्कृतीचा जागर घडवून आणणारा ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती – लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभव सोहळा’ सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोविंदराव टेंबे नाट्यगृह, देवल क्लब, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञान, भक्ती आणि अध्यात्माच्या विचारांचा तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने…

Read More

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी ते मंगळवार, १६ मार्च २०२७ या कालावधीत, तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी ते गुरुवार, ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा…

Read More

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जुलै 2027 च्या सत्रासाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून, प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर 2026 मध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून, प्रवेशपात्रता परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्रhttps://examinationservices.nic.in/ExamSys26Part2/Root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr531mFQBut90TMxhETt9bNm6zcP2ghS+a59eor30/A5h2io4z या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून यांच्या rimc.deu.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी केले. 0000

Read More