Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन शनिवार व रविवार, 14 व 15 फेब्रुवारी रोजी श्री इंजुबाईदेवी सांस्कृतिक भवन, गारगोटी (सोनाळी), ता. भुदरगड येथे करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ग्रंथालयांशी संबंधित सॉफ्टवेअर कंपन्यांचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. ग्रंथ प्रदर्शन/विक्री स्टॉलसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, 2078, आकाशगंगा अपार्टमेंट समोर, राजारामपुरी 11 वी गल्ली, कोल्हापूर येथे लेखी पत्रासह दि.…
कोल्हापूर, दि. २७* : सर्वसामान्यांची होणारी फसवणूक, आरोग्याशी चाललेला खेळ आणि कायद्याचे उल्लंघन करून जे कोणी चुकीच्या पद्धतीने उपचार करत असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. प्रत्येक गावोगावी आणि शहरांमध्ये विशेष मोहीम राबवून अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी. जिल्ह्यातून बोगस डॉक्टर ही संकल्पनाच हद्दपार करून गावे ‘बोगस डॉक्टरमुक्त’ असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बोगस डॉक्टर विरोधी समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक तहसील कार्यालय,…
कोल्हापूर, दि. २७ (जिमाका): अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत, जातीच्या दाखल्याअभावी ६ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांची दखल घेत, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अशा प्रकरणांमध्ये संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी (प्रांताधिकारी) समन्वय साधून तातडीने जातीचा दाखला देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती’च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, पोलिसांकडे जी १५ प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित…
कोल्हापूर दिनांक 24 – पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेस वेतवडे पंचायत समिती मतदार संघासाठी स्वर्गीय आमदार पी. एन.पाटील साहेब यांचा आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या पाठबळावर सर्वसामान्य रुग्णांना अडचणीच्या समयी आधारवड ठरणाऱ्या आणि कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात आधार देणाऱ्या बाजीराव कांबळे यांच्या सौभाग्यवती सौ. शितल कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरल्या असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे सौ. शितल कांबळे यांनी सांगितले. येथील मतदार संघातील मतदार बंधू भगिनींशी जिव्हाळ्याचे संबंध ग्रामीण भागातून जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ते कोणत्याही वेळी निस्वार्थी भावनेने मदत करतात. अडचणीच्या वेळी रुग्णांच्या वेदनेवर मारलेली हळुवार फुंकर हीच माझी पुण्याई आहे.स्वर्गीय आमदार…
कोल्हापूर दिनांक 24 – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सांगरूळ मतदार संघातून काँग्रेसच्या सौ. शितल संदीप यादव यांची उमेदवारी लक्षवेधी ठरणार का? यावर चर्चेला उधाण आले असून या मतदार संघात त्या “सांगरूळ” च्या प्रबळ विजयी दावेदार समजल्या जात आहेत. उमेदवार शितल यादव यांचे पती स्वामी समर्थ टाईल्स (बलिंगा) चे संदीप यादव यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.संदीप यादव यांनी आजपर्यंत गरीब,गरजू,अनाथ असलेलेल्या विद्यार्थांसाठी निवासी शाळा असलेल्या उमेद फाऊंडेशनच्या माध्यमातुन त्यांनी शैक्षणिक साहित्य व पोषण आहार तसेच उमेद मायेचे घर म्हणजेच निवासस्थानला लागणारे टाईल्स मटेरीयलची मदत,गावातील व भागातील बऱ्याच…
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व कोल्हापूर बाईकिंग कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सर्व वाहनधारक, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना, वाहन वितरक संघटना, सर्व रिक्षा संघटना यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत हेल्मेट जनजागृती व रक्तदान शिबीर सोमवार, 26 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिली आहे. हेल्मेट जनजागृती रॅलीद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करणे तसेच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. या रॅलीस सर्वांनी हेल्मेट घालून उपस्थित…
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ग्रंथभेट योजनेअंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथांची खरेदी करून ते राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना भेट स्वरूपात वितरित करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत खरेदीसाठी ग्रंथांची निवड तसेच ग्रंथालय संचालनालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या शासनमान्य ग्रंथ निवड यादीत समावेशासाठी, सन 2025 (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025) या कालावधीत प्रकाशित व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत (Complimentary Copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई–400001 यांच्याकडे दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर…
कोल्हापूर दि. 23 (जिमाका) : राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था अशा शासकीय-निमशासकीय यंत्रणा तसेच सामाजिक अशासकीय संस्था व स्थानिक पोलीस यंत्रणा यांना प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही व अशा प्रकारांना पायबंद बसेल याची काळजी घ्यावी. तसेच समारंभानंतर रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेले राष्ट्रध्वज योग्य तो मान राखून ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी…
कोल्हापूर, दि. २३ (जिमाका) : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते व सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, कोल्हापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व शहिद जवानांचे कुटुंब यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये असेही आवाहन करण्यात आले आहे. मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी दि. २६…
कोल्हापूर, दि. २३ : २५ जानेवारी या १६ व्या ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या निमित्ताने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गीता गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नायब तहसीलदार जयंत गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर दृढ निष्ठा ठेवून, अशी प्रतिज्ञा घेतो की, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू. मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकांचा गौरव कायम राखू. तसेच…