Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचा प्रमाण अधिक आहे. एचपीव्ही लसीकरणाने मुलींना सक्षम व आरोग्यदायी कॅन्सर मुक्तीसाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV) लसीकरणाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, देशात दर 8 मिनिटांनी एक महिला गर्भाशयांच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे थांबायला हवे. या कर्करोग मुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस ही मुली व महिलांसाठी आरोग्यदायी आहे. मुलींच्या शरीरावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम…
कोल्हापूर दि 21 (जिमाका): शासनाकडून दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापी सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसवण्यासाठी 30 जून पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे. सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्याकरीता M/s.Rosemerta Safety Systems Ltd या उत्पादक संस्थेची नेमणूक केलेली आहे. या उत्पादक संस्थेने कोल्हापूर जिल्ह्याकरीता एकूण 29 अधिकृत फिटमेंट सेंटर्सची नियुक्त केली आहे. वाहनधारकांनी https://transport.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर नोंदणी करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईटमेंट घेऊन वाहनांवर HSRP बसवण्याची कार्यवाही करावी. अधिकृत फिटमेंट सेंटर्सची (FC) कडून…
कोल्हापूर दि 21 (जिमाका): श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे इंडोकाऊंट फाउंडेशन एम. आय. डी. सी गोकुळ शिरगाव, कोल्हापूर यांचे सी.एस.आर.फंडातून नवीन व्यायामशाळेचे बांधकाम सुरु करण्यात आले असून या ठिकाणी अद्यावत व्यायाम साहित्य तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लॉकर्स चेंजिंग रुम इ. सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या व्यायामशाळेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडू, महिला व नागरीक यांना होण्याच्या दृष्टीने गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर वार्षिक फी मध्ये सुट देण्यात येवून पुरुषांसाठी 5 तर महिलांसाठी 4 हजार रुपये फी आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खेळाडू व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे विभागीय उपसंचालक माणिक पाटील यांनी…
कोल्हापूर दिनांक 22 – सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष. ऍड दत्ताजीराव कवाळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांजरपोळ येथील जनावरांना चारा वाटप लहान मुलांना खाऊचे वाटप करुन साजरा करण्यात आला .याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बंडा लोंढे, पांजरपोळ संस्थेचे डॉ राजकुमार बागल, गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे, प्रतिष्ठानचे सचिव विनायक पाटील, दावीद भोरे,अजय कांबळे,प्रशांत अवघडे, रवी कवाळे, प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रथमेश मोरे,विकी शिंदे,आदि उपस्थित होते
कोल्हापूर दिनांक 22- १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरु करण्यात आली आहे. *❇️ योजनेचा उद्धेश ?* योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु. कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह *❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :* *१.* पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे *२.* पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे *३.* प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे *४.* प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५…
कोल्हापूर दि 21 (जिमाका ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की, शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !! बाबासाहेबांचा हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यरत राहणार असून भविष्यात शिक्षणासाठी मुला – मुलींचे वसतीगृह उभारण्याला हा विभाग प्राधान्य देईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले . माणगाव परिषदेच्या 105 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. अशोक माने होते. ते पुढे म्हणाले, माणगाव परिषदेपासून बाबासाहेबांच्या रुपाने संपूर्ण जगाला एका महान व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. तत्कालीन कालखंडात आपल्या कार्यरुपाने बाबासाहेबांनी क्रांती केली. माणगाव येथील लंडन हाऊसच्या दुरुस्तीचे कामकाज सुरु करावे, त्यासाठी आपण निधी देऊ…
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दिनांक 22 मार्च 2025 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता एचपीव्ही लसीकरण संदर्भांत आढावा बैठक. (स्थळ : छत्रपती शाहू सभागृह, गडहिंग्लज) दुपारी 12 वाजता वडरगे, ता. गडहिंग्लज येथे यात्रेनिमित्त सदिच्छा भेट. (स्थळ : वडरगे, ता. गडहिंग्लज) दुपारी 2 ते सायं. 6 वाजता राखीव. सायं. 6 वाजता सुळकूड ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा. (स्थळ…
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 22 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे. हा…
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर येथील कुक्कुट प्रक्षेत्रावर प्रशिक्षणार्थींसाठी वर्षभर कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्कीट हाऊस जवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.एम. राऊत यांनी केले आहे. यामध्ये 5 दिवस कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी 200 रुपये सेवाशुल्क, 15 दिवसासाठी 500 रुपये सेवाशुल्क असणार असून व ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने प्रशिक्षण असणार आहे. तर 30 दिवसासाठी 2 हजार रुपये व 6 महिन्यासाठी 4 हजार रुपये सेवाशुल्क असणार असून प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने असणार आहे. सर्व प्रशिक्षणासाठी आधार कार्ड, शिक्षण…
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृतीसाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विभाग, कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन 2024-25 योजनेअंतर्गत शनिवार, दि. 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता मौजे कुर, ता. भुदरगड येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2025 पौष्टिक तृणधान्य रॅली व ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, ग्राहक तृणधान्यांचे संघ, विक्रेते, उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योजक तसेच शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व कृषी उपसंचालक नामदेव…