Author: admin

कोल्हापूर, दि. 01 (जिमाका) : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळणार असून, दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून प्रोफाइल तयार करावे व विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. सध्या उपलब्ध असलेल्या काही इंटर्नशिप संधींमध्ये चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड येथे सेल्स अँड मार्केटिंग पदासाठी अर्जाची…

Read More

कोल्हापूर, दि. 01 (जिमाका): पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग व अंबिया बहार 2026-27 या एक वर्षाच्या कालावधीकरिता राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मृग बहारामध्ये जिल्ह्यामध्ये पेरू या फळपिकासाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. तर अंबिया बहारामध्ये आंबा (क), काजू, केळी (ब), नारळ (ब) या फळपिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या फळपिकांकरिता प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता आणि योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे –  आंबा- विमा संरक्षित रक्कम (रु./हे)- 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (रु./हे)- 8 हजार 500 रुपये व योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31…

Read More

कोल्हापूर दि : 30 (जिमाका) येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत डी .वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (कसबा बावडा) या ठिकाणी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातर्गंत (TPO – HR Meet) हा कार्यक्रम पार पडला . यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम ,कॅम्पस संचालक अभिजीत माने , युवा शक्ती स्किल इंडिया प्रा.लि चे संचालक डॉ सतीश पवार, ज्येष्ठ उद्योजक शाम तोतला , अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी चेडे , जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे , बालाजी बिराजदार आदी उपस्थित होते . यावेळी मार्गदर्शन करताना श्री चेळे म्हणाले , युवकांनी स्वतःच्या क्षमता…

Read More

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्हाधिकारी लोकशाही दिन येत्या सोमवारी म्हणजे 6 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी केले. तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्तस्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो. अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1…

Read More

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील २९ हजार ६५० शेतकरी कर्जखात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी २९ हजार ४०९ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे.…

Read More

कोल्हापूर, दि. २६* : कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे नूतनीकरणानंतर आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नूतनीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून स्मारक भवनाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आमदार अशोक माने, उपमहापौर अक्षय जरग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी…

Read More

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्या वतीने दसरा चौक येथे समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समता दिंडीचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. पालकमंत्री आणि मान्यवरांनी समता दिंडीच्या पालखीला खांदा दिला. यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त…

Read More

कार्यक्षेत्रातील गावांची अधिसूचना प्रसिद्ध कोल्हापूर, दि. 24: राज्य शासनाच्या निर्णयानुसार चंदगड तालुक्यात मजरे कार्वे येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात येत असून, त्याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नव्या कार्यालयाचे मुख्यालय मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे राहणार असून, कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तुर्केवाडी, माणगाव, कोवाड, चंदगड, नागनवाडी आणि हेरे या सहा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी दिली आहे. या मंडळांअंतर्गत चंदगड तालुक्यातील शेकडो महसूल गावे नव्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे महसूलविषयक सेवा, दैनंदिन प्रशासकीय कामकाज, दाखले, नोंदी तसेच विविध शासकीय सेवा नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि स्थानिक…

Read More

खरीप पीक कर्जाचे सर्व उद्दिष्ट पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड कोल्हापूर, दि. 26* : कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता तब्बल 47 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून सर्व बँकांनी समन्वयाने काम करून हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये तसेच जुलैअखेर पीक कर्ज वितरणाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक (बँक…

Read More

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2026 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडिद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकस्पर्धेची वैशिष्टे – पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै- मूग व उडिद, 31 ऑगस्ट- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र आहे. सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये 300 तर आदिवासी गटासाठी रक्कम रुपये 150 असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.…

Read More