Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर दिनांक 27 – शिवाजी पूल ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे व जुना बुधवार तालीम ते स्मशानभूमी अशी वाहतूक चालू करण्यात आली आहे परंतु जुना बुधवार तालमीकडून स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही लाईट चालू नाहीत.यामुळे रात्री या रस्त्यावरून अंत्ययात्रा नेणे फारच कठीण आहे कारण जवळपास 15 ते 20 भटकी कुत्री या रस्त्यावर वावरत असतात व एक दोघे गाडीवरून अथवा चालत जात असताना ते डायरेक्ट अंगावर येतात त्यामुळे कृपया या रोडवर सर्व लाईट लवकरात लवकर चालू होणे अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे आहे तसेच रस्त्याच्या बाजूला दलदल झाल्यामुळे स्मशानभूमिकडे जाताना खूप कसरत करत जावे लागते तरी त्या ठिकाणी…
कोल्हापूर दिनांक 24 – करवीर तालुक्यातील कोपार्डे गावातील नगर भूमापन क्रमांक १९२ या जागेवर ग्रामपंचायतीने शासकीय निधीतून बांधकामे करून अतिक्रमण केल्याने समतावादी महासंघाच्या वतीने बुधवार दिनांक 25 रोजी करवीर पंचायत समिती कार्यालसमोर निदर्शने करण्यात आली. याबाबत समतावादी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले की,सदरची जागा ही लक्ष्मी शंकर बुरुड या मागासवर्गीय गरीब कुटुंबाची मिळकत आहे.त्यांच्या या खाजगी मिळकतीत कोपार्डे ग्रामपंचायत यांनी पूर्वी दांडगाव्याने तीन दुकान गाळे बांधलेले आहेत. व तेव्हापासून ग्रामपंचायत यांनी ती सर्व दुकान गाळे भाडे तत्वावर देऊन त्यांच्याकडून भाडे आकारणी करीत आहेत. सदरच्या जागेचे मालक हे अशिक्षित व गरीब असल्यानेच त्यांच्या असाह्यतेचा फायदा घेत बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने ग्रामपंचायत यांनी…
कोल्हापुर दिनांक 25- जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापुर जिल्हयामध्ये घडणारे गैरकृत्ये, बेकायदेशीर कृत्ये, अवैध व्यवसाय तसेच महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार यांना प्रतिबंध करणेबाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.कोल्हापुर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतुन कोल्हापूर जिल्हयातील नागरीकांना आपले वास्तव्याचे परिसरामध्ये कोणतेही गैरकृत्य आढळुन आल्यास, बेकायदेशिर व्यवसाय सुरु असल्यास तसेच महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार त्यामध्ये कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण तसेच शाळा,कॉलेज, परिसरामध्ये मुलींची छेडछाड असे प्रकार आढळुन आल्यास त्याची माहिती पोलीसांना देणे नागरीकांना सुलभ व्हावे या करीता नव्याने हेल्पलाईन सुरु केलेली आहे. सदर हेल्पलाईनचा क्रमांक ९८२२७६६१०० असा असुन…
कोल्हापूर दिनांक 24 – महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सर्व शाळांना सी सी टी व्ही बसविणे बंधनकारक असताना ज्या शाळांनी अद्याप सीसीटीव्ही बसविले नाहीत त्या सर्व शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली आहे. राज्यात शाळेतील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश दिले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.परंतु ज्या खाजगी शाळा आहेत त्या पैकी बहुतांश शाळांनी अद्याप कार्यवाही केली नसल्याचे सांगून अशा शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनच्या शिष्ट मंडळाला दिले.अन्यथा समितीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करण्यासाठी…
कोल्हापूर दिनांक 24- माहिती अधिकार अन्वये प्राप्त माहितीने तक्रारीची भीती दाखवत 15 लाखाच्या खंडणी मागणाऱ्या जयराज कोळी रा.नेहरूनगर व युवराज खराडे रा.उचगांव या खंडणी बहाद्दरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.सदरची कारवाई लक्ष्मी टेकडी परिसरात महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. अजिंक्य अनिल पाटील, रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे पत्नीचे वैद्यकीय शिक्षण पुर्ण झालेनंतर त्या सीपीआर हॉस्पीटल येथे बंधपत्राप्रमाणे एम. डी. डॉक्टर म्हणुन सन 2024 ते मार्च 2025 पर्यत कार्यरत होत्या.अजिंक्य पाटील यांच्या पत्नी सी. पी. आर. हॉस्पीटल,कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांच्या पत्नीस पगारामध्ये काही रक्कम जादा मिळाली होती. त्याबाबत प्रशासनाचे निदर्शनास येताच त्यांनी पगारातून वाढीव अदा झालेली…
कोल्हापूर दिनांक 24- माहिती अधिकार अन्वये प्राप्त माहितीने तक्रारीची भीती दाखवत 15 लाखाच्या खंडणी मागणाऱ्या जयराज कोळी रा.नेहरूनगर व युवराज खराडे रा.उचगांव या खंडणी बहाद्दरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.सदरची कारवाई लक्ष्मी टेकडी परिसरात महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. अजिंक्य अनिल पाटील, रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे पत्नीचे वैद्यकीय शिक्षण पुर्ण झालेनंतर त्या सीपीआर हॉस्पीटल येथे बंधपत्राप्रमाणे एम. डी. डॉक्टर म्हणुन सन 2024 ते मार्च 2025 पर्यत कार्यरत होत्या.अजिंक्य पाटील यांच्या पत्नी सी. पी. आर. हॉस्पीटल,कोल्हापूर येथे कार्यरत असताना त्यांच्या पत्नीस पगारामध्ये काही रक्कम जादा मिळाली होती. त्याबाबत प्रशासनाचे निदर्शनास येताच त्यांनी पगारातून वाढीव अदा झालेली…
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): जिल्ह्यातील व शहरातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खासगी अनुदानित, विना अनुदानित इंग्रजी माध्यमांसह सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 8 ते 8.25 या एकाच वेळेत एकूण 3 हजार 639 शाळांमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये 6 लाख 2 हजार 138 विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी योग दिनात सहभाग नोंदविला होता.* जागतिक योग दिन प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनामार्फत 45 मिनिटांचा प्रात्यक्षिक व्हिडिओ करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून योग दिन हा योगयुक्त शनिवार म्हणून शाळा मध्ये शॉर्ट फिल्म व्याख्यान व शाळा परिसरात प्रचार व प्रसार फेरी आयोजित करण्यात आली होती.…
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी/विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम 1 ते 3 किंवा ५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिनांक 20 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…
लिंगनूर कापशी, दि.१५: लिंगनूर कापशी ता. कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले. कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी येथील ग्रामस्थांची दिंडीप्रमुख कै. रामचंद्र ढेंगे दिंडी पंढरपूरला पायी वारी निघाली. यावेळी श्री.विठ्ठल पंथी दिंडी व श्री. दत्त पंथी भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन मंत्री श्री. मुश्रीफही सहभागी झाले. टाळ मृदंगाच्या निनादात “विठोबा रखुमाई” च्या गजराने सारा गाव दुमदुमला. दिंडीत सहभागी वारकऱ्यांना मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने रेनकोटांचे वाटपही केले. यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी…