Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. २ (जिमाका) राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली . कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार ६५० शेतकरी कर्जखात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे .या कर्ज खातेदारांपैकी सुमारे २९ हजार ४०९ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.उर्वरीत लाभधारकांची माहिती अपलोड करण्याचे काम सध्या सुरु आहे .लवकरच या कर्ज खातेधारकांमधून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९…
मुंबई, दि. २ : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या सहाय्यामुळे त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत पार पडून पुढील उपचार तातडीने सुरू करणे शक्य झाले. सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. या अपघातात त्यांच्या डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. उपचारासाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली. नातेवाईकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी…
कर्जमुक्ती ही केवळ खर्च नाही; ती राज्यातील अन्नदात्यांच्या भविष्यावर केलेली खरी गुंतवणूक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ कडे पाहताना ही भावना प्रकर्षाने जाणवते. ही योजना केवळ थकीत कर्जाची रक्कम माफ करण्यापुरती मर्यादित नाही, तर शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नव्याने सक्षम करण्याचा दूरदृष्टीचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील शेती ही आजही मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, गारपीट, रोगराई आणि वाढता उत्पादन खर्च या संकटांनी शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा वेळी अनेक शेतकरी पीक कर्ज घेतात; मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे वेळेत परतफेड करता येत नाही. परिणामी ते नव्या…
१२५ दिवसांची रोजगार हमी, विकसित ग्रामपंचायत आराखड्यावर भर कोल्हापूर, दि. २ : विकसित भारत – जी-राम-जी हा केवळ रोजगार देणारा कार्यक्रम नसून कामाची कायदेशीर हमी देणारा कायदा आहे. पात्र व्यक्तींना विहित कालावधीत काम उपलब्ध करून देता आले नाही, तर त्यांना भरपाई मिळणार आहे. या कायद्यामुळे गाव-खेड्यांचा सर्वांगीण आर्थिक विकास साधला जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विकसित भारत – जी-राम-जी (VB-GRAM G)’ ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, विकसित भारताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करावा. पारदर्शकता हे या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य असून…
कोल्हापूर, दि. 02 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी 2 ते 15 जुलै या कालावधीत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस विभागाची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू असणार…
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार) सन 2026-27 राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, पेरू पिकासाठी सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 14 जुलै आहे. योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी किमान उत्पादनक्षम फळबाग क्षेत्र 20 गुंठे (0.20 हेक्टर) असणे आवश्यक असून, प्रति शेतकरी कमाल 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर महसूल मंडळातील पेरू पिकासाठी प्रति हेक्टर 70 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना 3 हजार 500 रुपये विमा हप्ता भरावा…
कोल्हापूर, दि. १ जुलै : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरणास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची प्रत्येक जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २९ हजार ४०९ खातेदार शेतकरी यात सद्या पात्र आहेत. कृषी क्षेत्राला आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, शेतकऱ्यांना नव्याने कर्जपात्र बनविणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले…
कोल्हापूर, दि. 01 (जिमाका) : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळणार असून, दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून प्रोफाइल तयार करावे व विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. सध्या उपलब्ध असलेल्या काही इंटर्नशिप संधींमध्ये चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड येथे सेल्स अँड मार्केटिंग पदासाठी अर्जाची…
कोल्हापूर, दि. 01 (जिमाका): पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग व अंबिया बहार 2026-27 या एक वर्षाच्या कालावधीकरिता राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मृग बहारामध्ये जिल्ह्यामध्ये पेरू या फळपिकासाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. तर अंबिया बहारामध्ये आंबा (क), काजू, केळी (ब), नारळ (ब) या फळपिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या फळपिकांकरिता प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता आणि योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे – आंबा- विमा संरक्षित रक्कम (रु./हे)- 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (रु./हे)- 8 हजार 500 रुपये व योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31…
कोल्हापूर दि : 30 (जिमाका) येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत डी .वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (कसबा बावडा) या ठिकाणी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातर्गंत (TPO – HR Meet) हा कार्यक्रम पार पडला . यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम ,कॅम्पस संचालक अभिजीत माने , युवा शक्ती स्किल इंडिया प्रा.लि चे संचालक डॉ सतीश पवार, ज्येष्ठ उद्योजक शाम तोतला , अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी चेडे , जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे , बालाजी बिराजदार आदी उपस्थित होते . यावेळी मार्गदर्शन करताना श्री चेळे म्हणाले , युवकांनी स्वतःच्या क्षमता…