कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत.
महामंडळामार्फत आजपर्यंत सुमारे रु. 1,670 कोटींहून अधिक आर्थिक सहाय्य व्याज परतावा स्वरूपात वितरित करण्यात आले असून, राज्यातील 1 लाख 70 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महामंडळाची योजनांची कार्यवाही सुरु झाल्यापासून वर्षनिहाय फलनिष्पत्ती खालीलप्रमाणे आहे.
सन 2017-18 -0, सन 2018-19- 2.60, सन 2019-20- 28.53, सन 20-21-63.55, सन 2021-22-118.29, सन 2022-23- 178.81, सन 2023-24- 301.02, सन 2024-25- 388.88 असा एकूण 1670.37 कोटी रुपये. लाभार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे योजनांविषयी अचूक, जलद आणि विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी महामंडळाने Smart Bot आणि WhatsApp सेवा सुरू करून एक मोठा डिजिटल टप्पा गाठला आहे.
Smart Bot: लाभार्थी व संभाव्य लाभार्थी यांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तर : लाभार्थ्यांना अनेकदा योजनांची माहिती, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया किंवा व्यवसाय निवड यासंबंधी विविध प्रश्न निर्माण होतात. पूर्वी या माहितीसाठी कार्यालयीन भेटी, एजंट्स किंवा दीर्घ प्रतीक्षा यांचा सामना करावा लागत होता. हीच अडचण दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित (ChatGPT) Smart Bot सुरू करण्यात आला आहे. हा Smart Bot महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, 24×7 कार्यरत आहे. कोणत्याही वेळी लाभार्थी आपल्या प्रश्नाचे त्वरित उत्तर मिळवू शकतात.
व्हॉट्सॲप सेवा- या सेवेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जासंबंधित सर्व महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर मिळत आहे. व्हॉट्सॲपद्वारे LOI (Letter of Intent) संबंधित अपडेट्स, Claim सादर केल्याची व प्रक्रिया स्थिती, Sanction (मंजुरी) बाबत माहिती, व्याज परतावा जमा झाल्याची सूचना व इतर माहिती Templete द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महामंडळाचा अधिकृत व्हॉट्सॲप क्र. 8976855921 आहे. या व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक महामंडळाच्या वेबपोर्टलवर उपलब्ध असून, ही लिंक पुढीलप्रमाणे https://whatsapp.com/channel/0029VbBvVEo0VycIgdFnSu2H याचा वापर संबंधितांनी करावा, असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.