कोल्हापूर दिनांक 6- छत्रपती शिवाजी पुलानजीक आंबेवाडी रोडवर पुरबाधित क्षेत्रात भराव टाकण्याचे काम काही लोकांनी जोरात चालू केले असल्याचे दिसून येते.त्यामुळे नागरिकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून याचा फटका शुक्रवार पेठ परिसरातील नागरिकांना होणार असल्याने सदरचे काम त्वरित थांबविण्याची मागणी होत आहे.
छत्रपती शिवाजी पुलानजीक यापूर्वी सुद्धा भराव टाकून त्याठिकाणी गाळे उभा करण्यात आलेले आहेत.मुळात महामार्गालगत असणारी जागा कोणाच्या अखत्यारीत आहे हे समजून येत नाही.परंतु सदर जागेमध्ये भराव टाकून त्याठिकाणी व्यवसायासाठी गाळे तयार करणे म्हणजे पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणे होय.सदर ठिकाणी गाळे बांधण्यास परवानगी कोणी दिली याची चौकशी होणे गरजेचे आहे.सदर जागेतील सर्व बेकायदेशीर गाळे पाडून संबंधित जबाबदार असणाऱ्यावर प्रशासन काय कारवाई करणार याची उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांच्या रोषाला भविष्यात सामोरे जावे लागणार आहे.त्याआधी हे सर्व काम थांबण्याची मागणी जनतेतून होताना दिसत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
