कोल्हापूर दिनांक 30 – गेली दोन तीन दिवस शिवसेना उबाठा मध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून वादंग उठले आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या अस्वस्थता झाल्याचे दिसत होते.त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते हर्षल सुर्वे यांनी आता शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.सुर्वे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे,”साहेब माझी जिल्हाप्रमुख पदी निवड झाली नाही त्यामुळे मनातील खद व्यक्त केली होती,
मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली तीच जास्त जीव्हारी लागली आज पर्यंत आदेश मानूनच काम केले होते कधी आदेश डावलला नाही पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला निर्णय मान्य नसेल तर निघुन जावा,मला निर्णय मान्य नाही साहेब साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे.मी माझा पदाचा आणि सक्रिय सभासदचा राजीनामा देत आहे”.
तसेच सुर्वे यांनी शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब आणि संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर, शिवसेना उपनेते संजय पवार साहेब, यांना मी व्हाट्सअप वर राजीनामा पाठवला असल्याचे सांगितले.
