कोल्हापूर दिनांक 27 – शिवाजी पूल ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे व जुना बुधवार तालीम ते स्मशानभूमी अशी वाहतूक चालू करण्यात आली आहे परंतु जुना बुधवार तालमीकडून स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही लाईट चालू नाहीत.यामुळे रात्री या रस्त्यावरून अंत्ययात्रा नेणे फारच कठीण आहे कारण जवळपास 15 ते 20 भटकी कुत्री या रस्त्यावर वावरत असतात व एक दोघे गाडीवरून अथवा चालत जात असताना ते डायरेक्ट अंगावर येतात त्यामुळे कृपया या रोडवर सर्व लाईट लवकरात लवकर चालू होणे अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे आहे तसेच रस्त्याच्या बाजूला दलदल झाल्यामुळे स्मशानभूमिकडे जाताना खूप कसरत करत जावे लागते तरी त्या ठिकाणी किमान मुरुम टाकून घ्यावा व लाईट व्यवस्था नीट सुरळीत करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना जुना बुधवार पेठ यांच्यावतीने देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपशहरप्रमुख कपिल नाळे, फेरीवाले संघ.प्रमुख अर्जुन आंबी,भ.वि.जाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे,विनोद हजारे,सचिन क्षीरसागर,विनायक जाधव,केदार शिंदे,कल्पेश नाळे,नितीन मुधाळे, बबन राणे,अभि नांगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते*
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
